मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गोड बातमी, म्हाडा 1,000 घरांसाठी सोडत काढणार, केव्हा निघणार जाहिरात ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mhada News : स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवूडनगरी म्हणून देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला ओळख मिळालेली आहे. मात्र या स्वप्ननगरीत स्वप्नातील घर घेण ही काही सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना येथे घर खरेदी करणे अवघड होत आहे.

अशा परिस्थितीत अनेकांना मुंबईमध्ये घर घेताना म्हाडाच्या घरांचा मोठा आधार मिळत असतो. नागरिक म्हाडाच्या घराची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. म्हाडा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देते.

या घरांमुळे आत्तापर्यंत हजारो लोकांचा घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. म्हाडा प्राधिकरण वेगवेगळ्या प्रकल्पामधील घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देते. दरम्यान राजधानी मुंबईमध्ये म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे म्हाडा मुंबई मंडळ 2024 मध्ये नवीन लॉटरी जाहीर करणार आहे. यामध्ये तब्बल 1000 घरांचा समावेश राहणार अशी माहिती समोर आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये म्हाडा मुंबई मंडळाने दोन वर्षांच्या गॅप नंतर एक सोडत काढली होती.

या सोडतीमध्ये 4 हजार 82 सदनिकांचा समावेश होता. दरम्यान गेल्यावर्षीच्या या सोडतीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना सध्या स्थितीला सदनिकांचे वितरण केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या सोडतीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांपैकी आत्तापर्यंत 2800 अर्जदारांना घराचा ताबा मिळालेला आहे.

विशेष म्हणजे उर्वरित अर्जदारांना देखील लवकरात लवकर घराचा ताबा दिला जाणार आहे. अशातच मात्र म्हाडा मुंबई मंडळ 2024 मध्ये एक नवीन लॉटरी काढणार अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.

म्हाडा 2024 च्या या आपल्या नवीन लॉटरीत गेल्या वर्षीच्या लॉटरीत ज्या घरांची विक्री झालेली नसेल त्या घरांचा आणि नवीन प्रकल्पातील काही घरांचा समावेश करणार आहे. गेल्या वर्षातील लॉटरी मधील रिक्तघरे आणि काही नवीन गृहप्रकल्पातील घरे अशी एकूण 1000 घरे या नव्याने जाहीर होणाऱ्या लॉटरीत समाविष्ट केले जातील.

या अपकमिंग लॉटरीमध्ये गोरेगावमधील बांधकामाधीन प्रकल्पातील घरं, पवई, तुंगा, कन्नमवारनगर येथील प्रकल्पातील घरांचा समावेश राहणार आहे तसेच 2023 मधील लॉटरीतील जवळपास सहाशे सदनिका यामध्ये समाविष्ट राहणार असा अंदाज आहे.

ही लॉटरी ऑगस्ट 2024 मध्ये निघण्याची शक्यता आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच मुंबई मंडळ नवीन लॉटरी जाहीर करणार आहे.

या लॉटरीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात निघण्याची शक्यता आहे. लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि सोडत राबवली जाणार आहे.

Leave a Comment