Mumbai News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत वर्षात आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या सणासाठी मुंबईमधून मोठ्या प्रमाणात कोकणात चाकरमाने प्रवास करत आहेत. याशिवाय मुंबईहून इतरही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास केला जात आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश भक्त गावाकडे जात असल्याने मध्य रेल्वेच्या आणि कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.
अशातच मध्य रेल्वेने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईहून कोल्हापूर दरम्यान एक विशेष गाडी चालवण्याचे नियोजन आखले आहे. याबाबत मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे आता मुंबई ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष ट्रेन चालवणार आहे. यामुळे कोल्हापूर तसेच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईहून 23 सप्टेंबर 2023 ला एक विशेष गाडी सोडली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी 23 सप्टेंबरला मध्यरात्री बारा वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूर कडे रवाना होईल आणि कोल्हापूरला सकाळी साडेअकरा वाजता ही गाडी पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले या अतिशय महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सुरू असणारे सह्याद्री एक्सप्रेस काही कारणास्तव बंद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हे एक्सप्रेस पुण्यापर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. अशा स्थितीत मध्य रेल्वेने हा निर्णय घेऊन या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.