परतीच्या पावसाचा प्रवास पडला लांबणीवर ! आता ‘या’ तारखेलाच परतणार पाऊस, यंदाचा दसरा पावसातच जाणार का ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला होता. यानंतर मात्र राज्यातून पाऊस गायब झाला.

यामुळे ऑगस्ट महिन्याप्रमाणेच याही महिन्यात कमी पाऊस पडतो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना लागली होती. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

आज 19 सप्टेंबरला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. आज पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उल्हासाचे वातावरण आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यात सर्व दूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यातील बहुतांशी भागामध्ये जोरदार पाऊस होणार अशी शक्यता आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे लाडक्या गणरायाचे आगमन पावसातच होणार असल्याचे चित्र आहे. लाडका बाप्पा पावसातच गणेश भक्तांच्या घरी दाखल होणार असल्याने सर्वत्र आनंदाची लाट उसळली आहे. गेला ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसाची जोरदार हजेरी लागत असल्याने शेतकरी मोठे समाधानी आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर भारतीय हवामान विभागाने यावर्षी परतीचा पाऊस देखील लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले आहे. पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पाच दिवसात राज्यातील काही भागात हलक्या सऱ्या कोसळतील असे पुणे आयएमडीने स्पष्ट केले आहे. आग्नेय राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात मोठा पाऊस पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.

या क्षेत्राच्या प्रभावामुळे आगामी पाच दिवस महाराष्ट्रात केवळ हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे यावर्षी मान्सूनचे उशिराने आगमन झाले आहे त्याचप्रमाणे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त देखील यंदा हुकण्याची शक्यता आहे. काही हवामान तज्ञांनी यावर्षी मान्सून दसरापर्यंत कायम राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

म्हणजेच दसरा अर्थातच विजयादशमी सण झाल्यानंतर यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असे तज्ञ लोकांचा अंदाज आहे. यावर्षी 24 ऑक्टोबरला दसरा आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास देखील 24 ऑक्टोबरच्या आसपासच सुरू होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment