Mumbai News : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे अर्थातच अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे.
अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शहरातील आणखी एक महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्प मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील कोस्टल रोड प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या लोकार्पणाचा घोळ सुरू आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी तारीख ते तारीख दिली जात आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाचे उद्घाटन पूर्ण होऊ शकलेले नाही.
आता मात्र हा घोळ संपणार आहे. कारण की मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख आता फिक्स झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची एक मार्गीका 11 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईकरांसाठी खुली केली जाणार आहे.
वास्तविक ही मार्गिका शनिवारी म्हणजेच आज खुली होणार होती. याबाबतची निमंत्रण पत्रिका देखील छापली गेली. पण, निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार झालेला असतानाही या प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे लोकार्पण आता 11 मार्चला होणार आहे. हा मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. यामुळे या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्लॅन होता.
याचे लोकार्पण फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. नवी मुंबईमध्ये विविध प्रकल्पांच्या लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान महोदय आले असता या प्रकल्पाचे देखील उद्घाटन करण्याचा बेत आखला गेला होता.
मात्र फेब्रुवारीमध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नव्हते. यामुळे या कोस्टल रोडची एक मार्गीका फेब्रुवारी महिन्यात सुरू होऊ शकली नाही.
आता मात्र या प्रकल्पाचे लोकार्पण 11 मार्चला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण होईल.
यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे देखील नावे निमंत्रण पत्रिकेत छापली गेली आहेत.