Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी लोकल एक लाईफ लाईन म्हणून काम करत असते. लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जात असते. मात्र मुंबई लोकलचा हा प्रवास मुंबईकरांसाठी मोठा आव्हानात्मक बनत चालला आहे. हेच कारण आहे की मुंबई शहरात कामानिमित्त येणाऱ्या मुंबईच्या आजूबाजू वसलेल्या शहरातील नागरिकांसाठी मुंबई लोकलचा विस्तार केला जात आहे.
वेगवेगळ्या मार्गावर लोकल सुरू केली जात आहे. सध्या सुरू असलेले लोकलचे मार्ग विस्तारित केले जात आहेत. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे. अशातच मुंबई लोकल बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार कल्याण ते कसारा हा लोकल प्रवास लवकरच जलद आणि सुपरफास्ट होणार आहे. खरतर कल्याण ते कसारा या मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये कायमच मोठी गर्दी पाहायला मिळते.
त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की कल्याण ते कासारादरम्यान तिसरी मार्गीका उभारली जात आहे. दरम्यान याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
खरंतर कल्याण ते कसारा दरम्यानच्या रेल्वे मार्गावर होणारी गर्दी पाहता कल्याण ते कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गीका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला 2011 मध्येच मंजूर मिळाली होती.
मात्र प्रकल्प मंजूर झाल्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. 2020 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं. मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्णपणे तयार झालेला नाही.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी आतापर्यंत 75 टक्के भूसंपादन झाले आहे. तिसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या 49.23 हेक्टर जमिनीपैकी सुमारे 35.96 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. आता फक्त 38 टक्के भूसंपादन बाकी आहे.
भूसंपादनाच्या कामासोबतच इतरही अनेक महत्त्वाची कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. या मार्गिकेवरील 8 प्रमुख पुलांपैकी पाच पुलांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दोन रोड ओव्हरब्रिज प्रगतीपथावर आहेत आणि इतर महत्वाची कामे देखील सुरू आहेत.
विशेष म्हणजे प्रकल्पाचे काम 2026 पर्यंत पूर्ण असा आशावाद मध्य रेल्वेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक, कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेची एकूण लांबी 67.35 किमी असून यासाठी 792.89 कोटींचा खर्च केला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे या मार्गावरील लोकलमध्ये होणारी गर्दी बऱ्यापैकी कमी होणार आहे. यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. साहजिकच या परिसरातील लोकलमधील प्रवाशांचा प्रवास या निमित्ताने सुलभ आणि सुखकर होणार आहे.