Mumbai News : मुंबई ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर वासियांच्या माध्यमातून केली जात होती. यासाठी कोल्हापूर मधील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देखील पाठपुरावा सुरू केला आहे.
विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. खरंतर कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. कोल्हापूरहून मुंबईला आणि मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गे, ट्रेनने तसेच विमानाने प्रवास करता येत आहे.
पण या दोन शहरा दरम्यान प्रवास करण्यासाठी खूपच लिमिटेड ट्रेन उपलब्ध आहेत. शिवाय विमान सेवा देखील आठवड्यातून सात दिवस नाही. अशा परिस्थितीत या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी आहे. अशातच मात्र कोल्हापूर ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या या मार्गावर अनियमित विमान सेवा सुरू आहे. सध्या कोल्हापूर ते मुंबई दरम्यान आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू आहे. मात्र आता ही विमानसेवा दररोज सुरु राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर ते मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध राहणार आहे.
यासाठी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आल्या आहेत. विशेष बाब अशी की, या मार्गावर रोज विमान तर धावणारच आहे शिवाय सकाळ आणि रात्री विमानसेवा सुरू व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. पण या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही. मात्र आता ऑक्टोबर महिन्यापासून कोल्हापूर ते मुंबई रोजच म्हणजेच आठवड्यातून सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे.