वरुणराजा पुन्हा येतोय…! राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस अतिमुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : जुलै महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने थंड घेतले आहे. पाऊस आता विश्रांती मध्ये आहे. जुलै महिन्यात सरासरी पेक्षा 17 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती.

जुलै महिन्यात राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. काही भागात अतिवृष्टी झाली आणि परिणामी तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता राज्यातून पावसाचा जोर कमालीचा ओसरला आहे.

सध्या राज्यात केवळ ढगांची काळी चादर पाहायला मिळत आहे. राज्यात कुठेच गेल्या चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस झाला नाही. खरंतर पावसाने जवळपास सात ते आठ दिवसांपासून दडी मारली आहे. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू होता.

पण आता केवळ ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आगामी काही दिवस राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, येत्या चार दिवसात राज्यातील विदर्भ आणि कोकण विभागात जोरदार पाऊस बरसणार अशी शक्यता आहे.

विशेष बाब अशी की येत्या चार दिवसात दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता या संबंधित जिल्ह्यांसाठी आयएमडीकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खरंतर कोकणातुन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने काढता पाय घेतला आहे. आता मात्र कोकणात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण सोबतच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटमाथ्यावर पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या तिन्ही विभागात मात्र सर्व दूर पाऊस होणार नाही तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात आणि राजधानी मुंबई मध्ये मात्र अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच अधून मधून पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. एकंदरीत राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment