Mumbai News : मुंबई शहरासह उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यापैकी काही प्रकल्पांचे उद्घाटन देखील झाले आहे तर काही प्रकल्पांचे आता लवकरच लोकार्पण देखील होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मधल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून याचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
यावेळी नवी मुंबई शहरातील विविध विकास कामांचे पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. याशिवाय मुंबई मधल्या कोस्टल रोड प्रकल्पासंदर्भात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार केला जात आहे. या प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी 11 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोड मार्गावरील साडेतीन किलोमीटर लांबीच्या बोगद्यातूनही प्रवास केला आहे.
या प्रकल्पाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होणार याबाबत मुख्यमंत्री महोदय यांनी महत्त्वाची माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी कोस्टल रोड प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असे म्हटले आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. शिंदे यांनी कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम मरीन ड्राइव्ह ते वरळी सी-फेसपर्यंत ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे.
तसेच याचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच उद्घाटन देखील होणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या दुसऱ्या टनेलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची दाट शक्यता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच हा मार्ग सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होईल अन मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाच्या पाहणीत प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये मुख्यमंत्री महोदय यांनी समजून घेतली आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थातच अटल सेतू प्रकल्पाबाबत देखील महत्त्वाची अपडेट दिली आहे.
अटल सेतू हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी मार्ग 12 जानेवारीला लोकार्पित होणार असे त्यांनी म्हटले आहे. याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या प्रकल्पांतर्गत शिवडी ते न्हावासेवा दरम्यान सागरी मार्ग तयार होत आहे.
या सागरी मार्गामुळे अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात मुंबई ते नवी मुंबई चा प्रवास पूर्ण होईल आणि यामुळे मुंबई ते पुण्याचा प्रवास 90 मिनिटात शक्य होणार आहे. या मार्गाने प्रवास करण्यासाठी मात्र सर्वसामान्यांना 250 रुपये एवढा टोल द्यावा लागणार आहे.