Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या विकास कामांची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या अलीकडेच सुरू झालेल्या सागरी सेतूचा देखील समावेश होतो. या सागरी सेतूला अटल सेतू म्हणूनही ओळखले जात आहे.
हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असून या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. याव्यतिरिक्त मुंबईमध्ये अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यामध्ये वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्पाचा देखील समावेश होतो. वर्सोवा आणि विरारला जोडणाऱ्या या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा फायनल डीपीआर अर्थातच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट लवकरच तयार होणार आहे. येत्या महिन्याभरात हा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर मग या प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येईल अशी अशा व्यक्त होत आहे.
दरम्यान, यासाठी आवश्यक असलेले विविध सर्वेक्षण आणि अभ्यास आता अंतिम टप्प्यात आले आहेत. तसेच या प्रकल्पासाठी 55 हजार पाचशे कोटी रुपयांचा बांधकाम खर्च अपेक्षित आहे.
खरे तर हा प्रकल्प आधी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जाणार होता. पण आता या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी 55 हजार 500 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून प्रकल्पाचा एकूण खर्च हा 63 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहणार आहे.
दरम्यान या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे अभ्यास आता अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्च 2024 अखेरपर्यंत या प्रकल्पाचा डीपीआर तयार होणार असे बोलले जात आहे.
यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम एकूण दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. हा सागरी सेतू समुद्र किनारपट्टी पासून एक किलोमीटर अंतरावर उभारला जाणार असल्याने याचा किनारपट्टीला कोणताच धोका राहणार नाही.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 25 हजार पाचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 37 हजार 950 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.