मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. खरंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रवासासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.

मुंबई ते नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच अधिक आहे. या मार्गावर धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या हाउसफुल धावत आहेत. परिणामी या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान या मार्गावरील गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वेने देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नागपूरला रवाना होणार आहे. मात्र ही गाडी एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे.

म्हणजेच फक्त मुंबई ते नागपूर अशीच ही गाडी धावणार आहे. यामुळे राजधानीहून उपराजधानीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, आता आपण या विशेष एकेरी एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक आणि या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक

ही गाडी 19 फेब्रुवारी 2024 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. ही गाडी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून 32 मिनिटांनी ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन या रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ स्थानकावर थांबा देण्याचा मोठा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला आहे. अर्थातच या ट्रेनचा उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना देखील मोठा फायदा मिळणार आहे.

Leave a Comment