Mumbai News : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते विकासाची अनेक कामे सुरू आहेत. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राजधानीतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो.
खर तर गेल्या काही वर्षांमध्ये राजधानीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगारामीमित्त इथे संपूर्ण भारत वर्षातून मोठ्या प्रमाणात नागरिक स्थाईक होत असल्याची स्थिती आहे. यामुळे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढतच आहे.
हेच कारण आहे की आता महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी व्हावा तसेच तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अन्य पायाभूत सुविधांवर ताण येऊ नये यामुळे तिसरी मुंबई बसवण्याचा अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.
ही तिसरी मुंबई मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या बाजूला तयार होणार आहे. तिसऱ्या मुंबईला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची जोड राहणार आहे. हे नवीन शहर तब्बल 124 गावांमध्ये आणि 324 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये तयार होणार आहे.
निश्चितच यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीवरील बराचसा भार कमी होण्यास मदत मिळणार आहे. तत्पूर्वी मात्र मुंबईकरांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प येत्या काही दिवसात सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. खरे तर हा प्रकल्प सुरुवातीला सप्टेंबर महिन्यात चालू होणार असे बोलले जात होते.
नंतर याची डेडलाईन वाढवण्यात आली आणि या चालू महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प 25 डिसेंबर 2023 ला अर्थातच दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईकरांसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले जात होते.
विशेष म्हणजे या प्रकल्पाला श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांचेच नाव देण्यात आले आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार नव्हते. यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू होणार नाही हे स्पष्ट केले होते.
मात्र त्यांनी जानेवारी 2024 अखेरपर्यंत या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे देखील सांगितले होते. अशातच आता या प्रकल्पाच्या लोकार्पणाची तारीख समोर येऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे 12 जानेवारी 2024 ला उद्घाटन होऊ शकते. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
दरम्यान, मोदींच्या नासिक दौऱ्याची वेळ साधून हा प्रकल्प खुला करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे.या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर फक्त 20 ते 30 मिनिटात पूर्ण होऊ शकते असा दावा होत आहे.
मात्र या 22.76 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतुने प्रवास करताना प्रवाशांना तब्बल 500 रुपयांपर्यंतचा टोल द्यावा लागू शकतो अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. यामुळे हे टोल दर कमी केले पाहिजेत अशी मागणी केली जात आहे.