Mumbai Pune Railway : महाराष्ट्रात बैलपोळ्यानंतर विविध सणांची गर्दी होत असते. यामुळेच खानदेशात ‘पोळा करी सण गोळा’ अशी म्हण प्रचलित आहे. पोळा झाला की गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि त्यानंतर मग दिवाळीचा सण साजरा होतो. या मोठ्या सणांपूर्वी काही छोटे-मोठे सण देखील साजरे होत असतात.
एकूणच काय की, बैलपोळ्याच्या सणा नंतर राज्यात सणांची रेलचेल वाढते. या सणासुदीच्या काळातच मात्र राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काही तांत्रिक कामांमुळे मुंबई आणि पुण्यातून धावणाऱ्या तब्बल दहा एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड ते मनमाड दरम्यानच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वेने तब्बल दहा गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार रेल्वेच्या माध्यमातून 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर रोजी दौंड ते मनमाड दुहेरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव तसेच अकोळनेर-सारोळा या भागातील दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे.
या कामासाठी रेल्वेच्या माध्यमातून या मार्गावरील दहा एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर काही गाड्या वळवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या कामामुळे 24 आणि 25 तारखेला कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या गाड्यां रद्द राहतील ?
1)या कामासाठी 23 सप्टेंबरला जबलपूर रेल्वे स्थानकावरून सुटणारी जबलपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
2) 25 सप्टेंबरला पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी पुणे-जबलपूर ही गाडी रद्द राहणार आहे.
3) 23 सप्टेंबरला दादर येथून सुटणारी दादर-शिर्डी ही गाडी रद्द केली जाणार आहे.
4) 24 सप्टेंबरला शिर्डी येथून सुटणारी शिर्डी-दादर ही गाडी रद्द राहणार आहे.
5)पुणे-निजामाबाद ही एक्सप्रेस गाडी ३० सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
6) निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस ही गाडी देखील 30 सप्टेबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
7)पुणे-नांदेड ही गाडी 23 व 24 सप्टेंबर रोजी रद्द राहणार आहे.
8)नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 24 व 25 रोजी रद्द राहणार आहे.
9)राणी-कमलापती-पुणे एक्स्प्रेस ही 23 रोजी रद्द राहणार आहे.
10)पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस ही गाडी 24 सप्टेंबरला रद्द असेल.