मुंबईकरांसाठी खुशखबर ! 18 एप्रिल पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात. यंदा देखील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईमधील चाकरमानी आपल्या गावाकडे परतणार आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच अतिरिक्त पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे.

ही गाडी 18 एप्रिल 2024 पासून चालवली जाणार असून आज आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक?

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी (गाडी क्रमांक 01187) 18 एप्रिल 2024 ते 6 जून 2024 या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी थिविम रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

तसेच थिविम-एलटीटी ही विशेष गाडी (गाडी क्रमांक 01188) 19 एप्रिल 2024 ते 7 जून 2024 दरम्यान शुक्रवारी दुपारी 4.35 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचणार आहे.

याशिवाय, गाडी क्रमांक 01129 ही गाडी एलटीटी-थिविम सेकंड सिटिंग स्पेशल गाडी 20 एप्रिल 2024 ते 8 जून 2024 या कालावधीत प्रत्येक शनिवारी रात्री 10.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिवी येथे पोहोचणार आहे.

तसेच गाडी क्रमांक 01130 ही विशेष गाडी 21 एप्रिल 2024 ते 9 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही ट्रेन या काळात दर रविवारी दुपारी 4.35 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता एलटीटीला पोहचणार आहे.

कुठे थांबणार ही विशेष गाडी ?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीला या मार्गावरील 18 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी कोकणातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या 18 रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा येईल अशी माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईहून कोकण आणि कोकणातून मुंबईला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

Leave a Comment