Mumbai Railway News : मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दादर ते कोकण आणि कोकण ते दादर असा प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. कारण की कोकणातून येणारी एक एक्सप्रेस ट्रेन आता ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेंट्रल रेल्वेने मुंबईमध्ये मेगा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या मुंबईपर्यंत धावत नाहीयेत. या ब्लॉकच्या कारणामुळे कोकणातून जाणाऱ्या विविध गाड्यां मुंबईत येत नाहीयेत तसेच मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्या दुसऱ्या स्थानकावरून सुटत आहेत.
हा बदल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकातच संपत आहे. यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना या बदलाचा फटका बसू नये यासाठी आता सावंतवाडी ते दादर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेस संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. या एक्सप्रेसमुळे सावंतवाडी ते दादर आणि दादर ते सावंतवाडी हा प्रवास खूपच आरामदायी झाला आहे.
दरम्यान आता कोकणातून येणाऱ्या अनेक गाड्या पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत चालवल्या जात असल्याने यामुळे रेल्वे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी तुतारी एक्सप्रेस दादर ऐवजी ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याचा मोठा निर्णय सेंट्रल रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे.
ही एक्सप्रेस दिनांक 27 मे ते एक जून 2024 या कालावधीत दादर ऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.
यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. निश्चितच मध्य रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय कोकणातील नागरिकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार असून यामुळे त्यांचा रेल्वे प्रवास जलद होणार आहे.