एकच मोबाईल नंबर किती आधार कार्ड सोबत लिंक केला जाऊ शकतो ? UIDAI चे नियम काय सांगतात? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचा महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड असते. हे सरकारी डॉक्युमेंट जवळपास सर्वच शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये आवश्यक असते. या डॉक्युमेंट शिवाय भारतात कोणतेच काम करता येऊ शकत नाही. अहो साध सिम कार्ड जरी काढायचं असेल तरी देखील आधार कार्ड लागते.

याशिवाय, शाळेचे ॲडमिशन, बँक अकाउंट ओपनिंगसाठी आधार कार्ड लागते. पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटिंग आयडी कार्ड काढण्यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक असते. याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे.

अलीकडे तर आधार कार्डचा उपयोग करून बँकेत न जाता पैसे काढता येणे शक्य झाले आहे. केवळ आधार कार्ड आणि बायोमेट्रिकच्या आधारावर पैसे डिपॉझिट अन Withdraw करता येणे शक्य झाले आहे.

मात्र आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे अतिशय आवश्यक आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंग ज्याप्रमाणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे मोबाईल नंबर आधारला लिंक असणे देखील आवश्यक आहे.

मात्र अनेकांच्या माध्यमातून एक मोबाईल नंबर किती आधार कार्डला लिंक केला जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे अगदी सविस्तर उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या संदर्भात यु आय डी ए आय ने मोठी माहिती दिली आहे. खरे तर, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की प्रत्येक आधार कार्ड धारकाकडे स्वतःचा स्वतंत्र मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे का ? या प्रश्नाचे उत्तर नाही असंच आहे.

प्रत्येक आधार कार्ड धारकाकडे लिंक करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर असणे आवश्यक नाही. आधार कार्डधारकाचे वय कितीही असो, तो त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मोबाईल नंबर त्याच्या आधारशी लिंक करू शकतो.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI चे नियम सांगतात की, एकाच मोबाईल क्रमांक सोबत मल्टिपल आधार कार्ड लिंक केले जाऊ शकतात. म्हणजेच घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड एकाच मोबाईलनंबर सोबत लिंक केले तरीही काही टेन्शन नाही.

अर्थातच प्रत्येकच आधार कार्डधारकाकडे स्पेशल मोबाईल नंबर पाहिजेचं अशी कोणतीच आवश्यकता नाही. किंवा तसे नियम सुद्धा नाहीयेत. एकच मोबाईल नंबर सोबत घरातील सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड लिंक केले जाऊ शकतात.

मात्र आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे जर तुम्हीही अजून पर्यंत तुमच्या आधार सोबत मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Leave a Comment