मुंबईकरांसाठी खुशखबर ! 50 वर्षांपासून रखडलेल्या ‘या’ रेल्वे मार्गाचे काम झाले पूर्ण, ‘या’ दिवशी पीएम नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Railway News : आगामी वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभा तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे केंद्र शासनाच्या तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू असलेली बहुतांशी विकास कामे जलद गतीने पूर्ण करून ती सामान्य जनतेसाठी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याच सपाट्यात आता मुंबईकरांसाठी अति महत्त्वाच्या अशा रेल्वेमार्गाला देखील मुहूर्त लाभणार असल्याचे चित्र आहे. नेरूळ-उरण रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब अशी की, हा रेल्वे मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित केला जाणार असेल.

खरंतर, हा रेल्वे मार्ग 50 वर्षांपासून रखडला आहे. एकूण 27 किलोमीटर लांबीचा हा मार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरणदरम्यानचा थेट प्रवास करू इच्छिणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून हा मार्ग केव्हा सुरू होणार याबाबत नेहमीच विचारणा केली जाते.

मात्र आता रेल्वे प्रवाशांची ही आतुरता लवकरच संपणार आहे. हा संपूर्ण मार्ग लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तयारी केली जात आहे.

खरंतर नेरूळ ते घाटकोपर पर्यंतचा मार्ग हा प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. मात्र घाटकोपर ते उरण दरम्यानचा मार्ग अजूनही सुरू झालेला नाही. यामुळे हा देखील मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा अशी प्रवाशांची इच्छा आहे.

केव्हा सुरु होणार मार्ग?

मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलैपासून पुढील 23 दिवस लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान या अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यानच या नेरूळ-उरण मार्गावरील घाटकोपर ते उरण या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 15 जुलैपर्यंत म्हणजेच पुढील दहा ते 12 दिवसात केव्हाही या मार्गाचे उद्घाटन होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. 

Leave a Comment