Mumbai Railway News : देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा आणि जलद असल्याने या प्रवासाला अधिक महत्त्व आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क देशातील जवळपास सर्वच शहरांपर्यंत पोहोचलेले आहे.
त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी रेल्वेला विशेष पसंती दिली जात आहे. अशातच राजधानी मुंबईमधल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे मुंबईहून गुजरात मधील सुरत दरम्यान एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 17 जानेवारी 2024 पासून या मार्गावर विशेष गाडी सुरू झाली आहे. यामुळे मुंबई ते सुरत हा प्रवास गतिमान होणार आहे.
खरंतर दैनंदिन कामासाठी या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत या मार्गावर पश्चिम रेल्वेने विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील बांद्रा टर्मिनस ते सुरत येथील उधना रेल्वे स्थानकादरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेला या मार्गावर सुरू झालेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे इतर गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
पश्चिम रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09055/09056 बांद्रा टर्मिनस ते उधना दरम्यान चालवली जाणार आहे. 09055 बांद्रा टर्मिनस ते उधना विशेष एक्सप्रेस ट्रेन 17 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी मंगळवारी आणि शुक्रवारी धावणार नाही.
इतर दिवशी मात्र ही गाडी बांद्रा टर्मिनस येथून सकाळी 9:50 ने केला आणि दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी उधना रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. तसेच ०९०५६ उधना रेल्वे स्थानक ते बांद्रा टर्मिनस ही गाडी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी सोमवार आणि गुरुवारी वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवस सुरू राहणार आहे. ही गाडी उधना रेल्वे स्थानकावरून सव्वाचार वाजता रवाना होणार आहे आणि साडेआठ वाजता बांद्रा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठे राहणार थांबा
पश्चिम रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीला बोरिवली, विरार, बोईसर, वापी, वलसाड, बिलीमोरा आणि नवसारी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.