स्टेट बँक ऑफ इंडिया मधून Home Loan घेण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात ? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan Document Details : अलीकडे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात होम लोनची मोठी भूमिका पाहायला मिळते. सर्वसामान्य होम लोन घेऊन आपल्या ड्रीम होमचे ड्रीम कम्प्लीट करतात. दरम्यान आजची ही बातमी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी खूप खास ठरणार आहे.

कारण की आज आपण पब्लिक सेक्टरमधील अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेतून अर्थातच एसबीआय मधून होम लोन घेणाऱ्यांना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात या विषयी माहिती पाहणार आहोत.

तसेच आज आपण एसबीआय मधून 20 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर ग्राहकांना कितीचा हप्ता भरावा लागू शकतो याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआयचे होम लोन साठी व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक ग्राहकांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज, होम लोन, गोल्ड लोन, वाहन कर्ज, एज्युकेशन लोन अशा नाना प्रकारची कर्ज उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो.

विशेष म्हणजे एसबीआय होम लोन देखील अगदी कमी दरात ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. एसबीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या माध्यमातून 8.6% व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे. मात्र काही प्रसंगी हे व्याजदर वाढू शकते. व्याजदर हे व्यक्तीच्या सिबिल स्कोर वर आणि इतर गोष्टींवर अवलंबून राहणार आहे.

20 लाखाच्या होमलोनसाठी कितीचा हप्ता?

जर एसबीआय कडून तुम्ही 8.6% व्याजदराने वीस लाख रुपयाचे होम लोन घेतले आणि याची परतफेड वीस वर्षे कालावधीची ठेवली तर तुम्हाला 17,483 रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत तुम्हाला 21 लाख 95 हजार 981 रुपये व्याज भरावे लागणार आहे.

अर्थातच मूळ मुद्दल 20 लाख रुपये आणि व्याज 21 लाख 95 हजार 981 रुपये असे एकूण 41 लाख 95 हजार 981 रुपये भरावे लागतील.

एसबीआयमधून गृह कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात 

  • ओळखीचा पुरावा म्हणून पॅन/ पासपोर्ट/ ड्रायव्हरचा परवाना/ मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागते.
  • राहण्याचा पुरावा/पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणतेही एक डॉक्युमेंट लागते. 
  • Home Loan साठी मालमत्तेची कागदपत्रे सुद्धा लागतात. 
  • बांधकाम परवानगी लागते. 
  • अर्जदारच्या सर्व बँक खात्यांमधील मागील 6 महिन्यांची बँक स्टेटमेंट लागणार आहे.
  • वेतन स्लिप किंवा मागील 3 महिन्यांचे वेतन प्रमाणपत्र देखील लागेल.
  • मागील 2 वर्षांच्या फॉर्म 16 ची प्रत किंवा मागील 2 आर्थिक वर्षांच्या आयटी रिटर्न्सची प्रतही तुम्हाला होम लोन साठी लागणार आहे.
  • पगारदार अर्जदार/सह-अर्जदार/ हमीदारासाठी उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागू शकतो.

वर दिलेली कागदपत्रे फक्त एसबीआय मध्येच नाही तर जवळपास सर्वच बँकांमध्ये हीच कागदपत्र आवश्यक असतात. मात्र अर्जदाराला यापेक्षा अधिकचे देखील कागदपत्रे लागू शकतात. तसेच अर्जदाराचा सिबिल स्कोर हा चांगला पाहिजे. कमी व्याजदरात होम लोन हवे असेल तर सिबिल स्कोर 700 च्या प्लस पाहिजे.

Leave a Comment