Mumbai Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनता आपल्या मूळ गावी परतत असते.
याही वर्षी अनेक जण आपल्या मूळ गावाला जात आहेत. मुंबई, पुणे येथून हजारो नागरिक आपल्या गावी परतत आहेत. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे.
उन्हाळी सुट्ट्या, लोकसभा निवडणूक, लग्नसराई या सर्व पार्श्वभूमीवर सध्या विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे हाउसफुल होऊन धावत आहेत.
दरम्यान प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते थिविम यादरम्यान देखील विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे.
दरम्यान याच विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. खरं तर ही गाडी एलटीटी ते थिविम आणि थिविम ते एलटीटी यादरम्यान आठवड्यातून एकदा धावत होती. म्हणजे रेल्वेने या मार्गावर विशेष साप्ताहिक ट्रेन सुरू केली होती.
परंतु ही गाडी त्री-साप्ताहिक करण्याचा निर्णय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी आता आठवड्यातून तीनदा धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – थिविम ही अनारक्षित विशेष गाडी फक्त शनिवारी मुंबईतून सोडली जात होती. पण येत्या 13 तारखेपासून ही गाडी आठवड्यातून तीन दिवस सोडली जाणार आहे.
13 मे ते 5 जून या कालावधीत ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी राजधानी मुंबई येथून एलटीटी रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.
तसेच थिविम ते लोकमान्य टिळक टर्मिनस अनारक्षित विशेष गाडी फक्त रविवारी थिविम रेल्वे स्थानकावरून सोडली जात होती. पण, येत्या 14 तारखेपासून ही गाडी आठवड्यातून तीन दिवस सोडली जाणार आहे.
14 मे ते 6 जून या कालावधीत ही गाडी प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालवली जाणार आहे. एकंदरीत या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच कोकणातून मुंबईत येणाऱ्यांना देखील या गाडीचा मोठा फायदा होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जाऊ लागली आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना या गाडीमुळे मुंबईत येतानां सोयीचे होणार आहे.