माणिकराव खुळे यांचा मान्सून 2024 चा सविस्तर अंदाज ! Monsoon ‘या’ तारखेला दाखल होणार महाराष्ट्राच्या वेशीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2024 : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटण्यात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. सध्या शेतकरी बांधव शेतीमध्ये पूर्व मशागतीची कामे करत आहेत.

आपल्या परिवारासमवेत पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या एप्रिल महिन्यातही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला होता. काही ठिकाणी तर गारपीट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अशातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सोमवार पर्यंत वादळी पावसाचे सत्र सुरूच राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले असून या वादळी पावसाचा पुढील मान्सूनवर तर परिणाम होणार नाही अशी भीती देखील शेतकऱ्यांच्या मनात आहे.

अशातच, मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी मान्सून संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल निनो हा या चालु महिन्याच्या अर्थातच मे च्या अखेरपर्यंत कमकुवत होण्याची शक्यता आहे.

तसेच पुढील महिन्यात म्हणजे जून किंवा जुलैमध्ये अल निनो तटस्थ अवस्थेत म्हणजे न्यूट्रल होणार आहे. तसेच, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजूनवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजेच ला निना हा ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जेव्हा एलनिनो हा सक्रिय असतो तेव्हा मान्सून काळात कमी पाऊस पडत असतो. पण जेव्हा एलनिनो न्यूट्रल असतो तेव्हा याचा मान्सूनवर कोणताच परिणाम होत नाही. दुसरीकडे जेव्हा ला निना सक्रिय असतो तेव्हा मान्सून काळात खूप चांगला पाऊस होतो. एवढेच नाही तर खुळे यांनी यावर्षी इंडियन ओशियन डायपोल अर्थातच आयओडी देखील पॉझिटिव्ह राहणार असे म्हटले आहे.

यामुळे यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व घटकांमुळे यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते असे देखील त्यांनी म्हटले आहे. खरेतर मान्सूनचे दरवर्षी एक जूनला केरळमध्ये आगमन होत असते. यानंतर मानसून 10 जूनला मुंबईत दाखल होत असतो.

राजधानीत सलामी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून पोहोचत असतो. दरम्यान जेव्हा मान्सून केरळमध्ये दाखल होतो तेव्हाच मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होईल याबाबत योग्य ती माहिती मिळू शकणार आहे.

तथापि अनेक हवामान तज्ञांनी यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे. यामुळे आता मान्सूनचे नेमके महाराष्ट्रात कधी आगमन होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment