Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून अनेक जण आता आपल्या गावाकडे जात आहेत.
यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान ही अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
उन्हाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्याने अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहिला असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बनारस दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
यामुळे मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्यांना तथा उत्तर प्रदेश राज्यातून मुंबईला येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण सीएसएमटी ते बनारस या उन्हाळी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते बनारस उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सी एस एम टी-बनारस (ट्रेन क्रमांक ०११३७) उन्हाळी विशेष गाडी 21 एप्रिल ते 19 मे या कालावधीत चालवले जाणार आहे. या कालावधीत ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता बनारस अर्थातच वाराणसी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच, बनारस-सीएसएमटी उन्हाळी विशेष गाडी ( ट्रेन क्रमांक ०११३८) 22 एप्रिल ते 20 मे या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी प्रत्येक सोमवारी बनारस रेल्वे स्थानकावरून रात्री नऊ वाजता सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावर तिसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार आहे.
कोणत्या 12 रेल्वे स्थानकावर थांबणार
सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, सीएसएमटी ते बनारस ही उन्हाळी विशेष गाडी या मार्गावरील बारा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी आणि वाराणसी स्थांनकात थांबा मंजूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.