Mumbai Railway News : सध्या उन्हाळी हंगामातील सुट्ट्या सुरू आहेत. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. खरे तर दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. तसेच अनेक जण उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की आपल्या गावाला जात असतात.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईमधून देखील मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी आपल्या गावाकडे परतत असतात. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ती म्हणजे मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याविषयी देखील आता आपण माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय झाला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. यामुळे याचा मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 11 एप्रिल ते 27 जून या कालावधीत दर गुरुवारी 16:00 वाजता सुटणार आहे आणि कोचुवेली येथे दुसऱ्या दिवशी 20:45 वाजता पोहचणार आहे.
तसेच कोचुवेली येथून ही गाडी 13 एप्रिल ते 29 जून या कालावधीत दर शनिवारी 16:20 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 21:50 वाजता पोहचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या विशेष गाडीला या रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही विशेष साप्ताहिक गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिलेली आहे.