काय सांगता, साप घरात घुसला तर किचनमध्ये असणाऱ्या ‘या’ पदार्थाची फवारणी करा, साप आल्या पावली परतणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Snake Viral News : साप हा एक विषारी प्राणी आहे. हा सरपटणारा प्राणी नजरेस पडला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला बघताच आपला थरकाप उडतो. साप हा एक विषारी प्राणी असून सापाच्या अशा काही प्रजाती आहेत ज्याच्या दंशामुळे लगेचच प्राण गमवावे लागतात. यामुळे आपण सर्वजण सापांना खूपच घाबरत असतो.

मात्र, अनेकजण साप दिसला की भीतीपोटी त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. साप विषारी प्राणी असतो परंतु सर्वच साप विषारी नसतात. तसेच जरी साप विषारी असला तरी देखील त्याची पर्यावरणाला खूपच गरज आहे. यामुळे विषारी सापांचे देखील संवर्धन होणे आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला साप दिसला आणि तो साप विषारी जरी असला तरी देखील त्याला मारण्याऐवजी त्याच्यापासून दूर राहा आणि जवळील सर्पमित्राशी संपर्क साधून तो साप पकडून दूर वरील जंगलात सोडा. खरंतर पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर येतो आणि मानवी वस्तीमध्ये शिरतो.

पावसाळ्यात बिळात पाणी शिरते म्हणून तो मानवी वस्तीत येतो. उन्हाळ्यात मात्र प्रचंड उकाड्याने हैरान होऊन साप मानवी वस्तीकडे, थंड ठिकाणी जातो. याशिवाय अन्नाच्या शोधात देखील साप मानवी वस्तीत घुसतो. मासे, उंदीर, बेडूक हे सापाचे अन्न आहे. यामुळे या अन्नाच्या शोधात साप मानवी वस्तीत घुसू शकतो.

जर समजा थंडाव्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात जर साप तुमच्या घरात शिरला असेल तर तुम्ही काय केले पाहिजे जेणेकरून साप तुमच्या घरातून बाहेर जाईल ? याच संदर्भात आज आपण बहुमूल्य अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

साप घरात घुसला तर काय करणार

सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उग्र वासाने सापांना खूप भीती वाटते आणि उग्र वासाचा त्यांना खूप त्रास होतो. यामुळे जर घरात साप घुसला असेल तर ज्या ठिकाणी साप लपला असेल त्या ठिकाणी नवरत्न तेलासारखे उग्र वासाचे हेअर ऑइल फवारले तर साप अस्वस्थ होऊन बाहेर निघून जातो.

याशिवाय फिनाईल, बेकिंग पावडर, फॉर्मेलिन आणि केरोसीन तेलाची फवारणी केल्याने साप कोणालाही इजा न करता घराबाहेर पडू शकतो.

हे सर्व पदार्थ पाण्यात मिसळून घरात साप जिथे लपला असेल त्या जागे भोवती शिंपडले तर तो बाहेर निघून जातो. फिनाइल सारख्या तीव्र वासाचे द्रव्य थेट सापावर शिंपडू नका.

यामुळे त्याला इजा होऊ शकते. साप जिथे लपला असेल त्या जागेभोवतीच या औषधांची फवारणी करावी. आजकाल, झुरळ आणि डास मारण्यासाठी प्रत्येकाच्या घरात लाल आणि काळा हिट वापरला जातो.

जर तुमच्या घरात साप घुसला तर तुम्ही त्याच्या लपण्याच्या जागेभोवती HIT किंवा इतर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू शकता. त्यांच्या तीव्र वासामुळे साप मोकळ्या जागेत जाण्याचा प्रयत्न करत असतो.

Leave a Comment