नवीन घरासाठी मुंबई की नवी मुंबई कोणते ठिकाण आहे बेस्ट ? सर्वसामान्य कोणत्या शहराला दाखवताय पसंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Real Estate : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. या शहराला बॉलीवूडनगरी, मायानगरी, स्वप्न नगरी अशा कैक नावांनी ओळखले जाते. या शहरात आपलेही स्वतःचे, हक्काचे एक घर असावे असे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण आजही मुंबई शहरात दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराच्या सीमा या लक्षणीयरीत्या विस्तारल्या आहेत. शहराचा आकार हा आधीच्या तुलनेत अधिक वाढला आहे. विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांमुळे अलीकडे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

मुंबई शहरात आणि उपनगरात घरांचे अनेक प्रकल्प बांधकामाधीन आहेत. मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजेच ठाणे रायगड आणि पालघर या भागांमध्ये एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत तब्बल 1875 नवीन गृह प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.

तसेच, महारेराकडून मागील आर्थिक वर्षात राज्यातील 4332 गृहप्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यात एमएमआरमधील प्रकल्पांचाही समावेश आहे हे विशेष. याचाच अर्थ नजीकच्या भविष्यात मुंबई आणि मुंबई महानगर क्षत्रात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना कैक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

सर्वसामान्यांना आपल्या बजेटमध्ये आणि आवडत्या ठिकाणी भविष्यात घरे खरेदी करता येणार आहेत. घरांचे शेकडो पर्याय नागरिकांपुढे उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबईमध्ये देखील विविध गृह प्रकल्पांची कामे सध्या स्थितीला सुरू आहेत. या शहरात आतापर्यंत अनेक गृह प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत आणि काही गृहप्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत.

यामुळे गृह खरेदीसाठी नवी मुंबईचा पर्याय देखील बेस्ट ठरू लागला आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे केली जात असल्याने भविष्यात मुंबईतून अनेकांचे पाय नवी मुंबईकडे जातील. नवी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गृह खरेदी वाढणार आहे.

किंबहुना आजही नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी तथा कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक केली जात आहे. नवी मुंबईमधील पायाभूत सुविधांचा झालेला विकास, गृहप्रकल्पांची आरामदायी रचना, मोकळे रस्ते, गृह प्रकल्पांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा त्यामुळे अनेकांनी नवी मुंबईमध्ये घर घेण्याला पसंती दाखवली आहे.

वाशी आणि बेलापूर मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कार्यालयांसाठी जागा शोधायला सुरुवात केली आहे. वाशीपासून सानपाडा, सीवूड्स, नेरुळ, बेलापूर, खारघर आणि अगदी पनवेलपर्यंत निर्धारित जागेत मॉल, रुग्णालयं, छोटे-मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, गार्डन आणि तत्सम सोईसुविधा उपलब्ध होत असल्यामुळे नवी मुंबईत गृह खरेदी वाढलेली आहे.

त्यामुळे नजीकच्या भविष्यात नवी मुंबई मुंबईला जोरदार टक्कर देणार आहे. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित झालेला नवीन सागरी ब्रिज, वाशीचा खाडी पूल, नव्याने विकसित होत असलेले नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाशीमधील एपीएमसी इत्यादी कारणांमुळे आता नवी मुंबईला प्राधान्य दिले जात आहे.

नवी मुंबईत रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, सर्वसामान्य गृह खरेदीदार, उद्योजक इत्यादी लोकांनी नवी मुंबईत प्रॉपर्टी खरेदी करायला पसंती दाखवलेली आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांमध्ये गृह खरेदीचा आलेख वाढत आहे. नागरिक आपल्या सोयीने या दोन्हीपैकी एका शहरात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत.

Leave a Comment