Mumbai To Gujrat Flight : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील विमान प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक गोड बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विमान प्रवाशांसाठी आता एअर इंडिया एअरलाइन्स कंपनीच्या माध्यमातून एक नवीन विमान सेवा सुरू केली जाणार आहे.
राजधानी मुंबई ते गुजरात मधील भूज दरम्यान ही विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे आता मुंबईमधून विमानात बसून थेट गुजरात मधील भुजमध्ये उतरता येणार आहे.
मुंबई ते गुजरात दरम्यान विमानसेवा अधिक वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. साहजिकच या निर्णयामुळे मुंबई ते गुजरातचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्या नागरिकांना थेट भुजला जायचे असेल अशा नागरिकांसाठी एअर इंडिया एअरलाइन्स कंपनीने घेतलेला हा निर्णय खूपच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे सदर नागरिकांचा प्रवास हा जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
एअर इंडिया कंपनीने मुंबई ते भुज दरम्यान दैनंदिन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे याची अंमलबजावणी या नवीन वर्षातच होणार आहे.
एक मार्च 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे एअर इंडिया एअरलाइन्स कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विमानसेवेचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
एअर इंडिया एअरलाइन्स कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबई येथून हे विमान एक मार्च 2024 पासून सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी टेकऑफ घेणार आहे आणि सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी हे विमान भुज येथे लँड होणार आहे.
म्हणजेच अवघ्या सव्वा तासात मुंबई ते भुज हा प्रवास पूर्ण होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर हे विमान भुज येथून सकाळी आठ वाजून 55 मिनिटांनी उड्डाणं भरणार आहे आणि 10 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा राजधानी मुंबईत लँड होणार आहे.