12 जानेवारीला एमटीएचएल प्रकल्पाचे लोकार्पण, ‘या’ प्रकल्पाच्या कधीही न ऐकलेल्या 5 रंचक गोष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MTHL Project Facts : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली असून त्यांचे केवळ लोकार्पण बाकी आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पा अंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी ब्रिज विकसित होत आहे.

22 किलोमीटर लांबीचा हा सागरी पूल असून यापैकी 16.50 किलोमीटरचे अंतर हे समुद्रावर असून उर्वरित अंतर जमिनीवर आहे. या ब्रिजला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा अटल सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज म्हणून ओळखला जाणार आहे.

खरे तर या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 15 ते 20 मिनिटात होणार आहे. तसेच मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 90 मिनिटात होईल असा दावा केला जात आहे. मुंबई ते अलिबाग हे अंतर कमी करणारा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन गेल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर 2023 मध्ये होणार होते. 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन होते. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी देखील सुरू केली होती. परंतु या प्रकल्पाचे नियोजित वेळेत काम पूर्ण झाले नाही.

यामुळे हा प्रकल्प त्यावेळी सुरू झाला नाही. दरम्यान आता या प्रकल्पाचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 ला होणार आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाच्या काही रंजक गोष्टी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1) अटल सेतू लांबीच्या निकषाने भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. तसेच लांबीच्या बाबतीत हा सागरी सेतू देशातील दहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक लांब सागरी सेतू म्हणूनही ओळखला जाणार आहे.

2) समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटी वेळी या पुलाच्या कामांना धक्का लागू नये यासाठी पाईल लायनर बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पाईल लायनरची उंची बुर्ज खलिफा पेक्षा 35 पट जास्त आहे.

3) अटल सेतूच्या निर्मितीसाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जेवढे जास्त काँक्रीट लागले आहे त्याच्यापेक्षा सहा पट जास्तीचे काँक्रेट लागले आहे. या देशातील सर्वाधिक लांबीच्या सेतूसाठी सात हजार मेट्रिक टन एवढ्या लोखंडी सळ्या वापरल्या गेल्या आहेत.

4) यात 84 हजार टन वजनाचे 70 डेक बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

5)या प्रकल्पासाठी पृथ्वीच्या तब्बल सात प्रदर्शना होतील एवढी लांब केबल वापरण्यात आली आहे. 500 बोईंग विमानं, 17 आयफेल टॉवरच्या वजनाचं लोखंड या अटल सेतुसाठी वापरण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment