मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 8 तासात ! ‘या’ महिन्यात खुला होणार संपूर्ण समृद्धी महामार्ग, MSRDC ची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai To Nagpur Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावण्याची क्षमता असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विकसित होत आहे.

या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान आज समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा खुला होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की आत्तापर्यंत या महामार्गाचे दोन टप्पे सुरू झाले आहेत.

पहिला टप्पा हा नागपूर ते शिर्डी दरम्यान चा होता. नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.

यानंतर मग गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.

अशा तऱ्हेने सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटर लांबीचे दोन टप्पे वाहतुकीसाठी सुरू आहेत. सध्या या मार्गामुळे नागपूर ते भरवीर हा प्रवास जलद झाला आहे.

आज, 4 मार्च 2024 ला या मार्गाचा तिसरा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

या टप्प्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एवढेच नाही तर या समृद्धी महामार्गाचा चौथा आणि अंतिम टप्पा केव्हा सुरू होणार ? याबाबत देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा शेवटचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा जुलै महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

इगतपुरी ते आमने या टप्प्यातील फक्त एका मोठ्या पुलाचे काम बाकी आहे, जे की युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे जुलै 2024 मध्ये संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होऊ शकणार आहे. 

Leave a Comment