Mumbai To Pune Travel Taxi Rate : भारतात प्रवासासाठी रेल्वेचा, बसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याशिवाय खाजगी ट्रॅव्हल्सने देखील मोठ्या प्रमाणात प्रवास केला जात असतो. तसेच टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे. राज्यात काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-सिल्वर वातानुकूलित टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे.
दरम्यान मुंबईहून नाशिक, शिर्डी तसेच पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई ते नाशिक, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते पुणे या तीन मार्गांवर धावणाऱ्या साध्या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या आणि निळ्या सिल्वर वातानुकूलित टॅक्सीचे भाडे वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या तिन्ही मार्गांवरील टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. खरे तर, मुंबईतील टॅक्सी संघटनांकडून भाडे वाढ झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही मार्गावरील टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.
खरेतर मुंबईहून नाशिक, शिर्डी आणि पुण्याला टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण खूप अधिक आहे. शेकडो लोक या मार्गांवर टॅक्सीने प्रवास करतात. आता मात्र या शेकडो लोकांना अधिकचे भाडे मोजावे लागणार आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भाडे किती वाढणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई ते नाशिक एसी टॅक्सी ने प्रवास करण्यासाठी 475 रुपये एवढे भाडे घेतले जात आहेत मात्र आता यामध्ये शंभर रुपयांची वाढ होणार आहे.
म्हणजे मुंबई ते नाशिक असे एसी टॅक्सीचे भाडे 575 रुपये होणार आहे. तसेच मुंबई ते शिर्डी असे एसी टॅक्सीचे भाडे 200 रुपयांनी वाढणार आहे. सध्या मुंबई ते शिर्डी असे एसी टॅक्सी चे भाडे 625 रुपये एवढे आहे आता मात्र या प्रवासासाठी 825 रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे.
मुंबई ते पुणे असा साध्या टॅक्सीने प्रवास करण्यासाठी आता पन्नास रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे. सध्या मुंबई ते पुणे हा प्रवास साध्या टॅक्सीने करण्यासाठी 450 रुपयांचे भाडे लागते, पण आता यात 50 रुपयांची वाढ होईल आणि हे भाडे पाचशे रुपयांवर जाणार आहे.
दुसरीकडे मुंबई ते पुणे एसी टॅक्सीच्या भाड्यात देखील 50 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या मुंबई ते पुणे एसी टॅक्सी चे भाडे 525 रुपये आहे मात्र हे भाडे पन्नास रुपयांनी वाढणार आहे अर्थातच आता 575 रुपये एवढे भाडे लागणार आहे.
भाडेवाढ तर झाली आहे मात्र याची अंमलबजावणी केव्हापासून होणार ? याची फिक्स तारीख समोर आलेली नाही. परंतु, पुढल्या महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित एक एप्रिल 2024 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते.