राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! आता रजा घेतांना…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी तथा कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा नियम एक एप्रिल 2024 पासून बदलणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना एक एप्रिल 2024 पासून ऑफलाइन पद्धतीने रजेचा अर्ज सादर करता येणार नाही तर आता कर्मचाऱ्यांना ऑनलाइन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्थातच आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना रजा घ्यायची असेल तर त्यांना प्रचलित असलेल्या ऑफलाइन पद्धतीने रजा अर्ज सादर करता येणार नाही.

तर त्यांना आता ऑनलाईन रजा अर्ज सादर करावा लागणार आहे. नवीन आर्थिक वर्षात हा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा बदल राहणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काल अर्थातच 28 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेले आहेत. राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसाठी आता एक नवीन प्रणाली विकसित झाली आहे.

ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टम असे या नवीन प्रणालीचे नाव आहे. या अंतर्गत राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आता डिजिटल म्हणजे ऑनलाईन झाले आहे.

या नवीन प्रणाली अंतर्गत रजेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. सुट्टी या कॉलममध्ये हा ऑनलाईन अर्ज राज्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.

खरंतर बऱ्याच विभागांमध्ये सुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे आढळले आहे. मात्र आता सर्वांनाच सुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता नवीन आर्थिक वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना रजा घ्यायची असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

निश्चितच या नवीन सुविधेमुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना मोठी सवलत उपलब्ध होणार असून त्यांना सहजतेने अर्ज सादर करता येणार आहे.

Leave a Comment