Mumbai To Shirdi Railway : शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. शिर्डी नगरी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. साईनगरी शिर्डीत मुंबईहुन देखील हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
मात्र सध्या स्थितीला मुंबई ते शिर्डी हा प्रवास करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या स्थितीला या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल सहा तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच मुंबई ते शिर्डी हा प्रवास एका तासात होणार आहे. अर्थातच प्रवाशांचा पाच तासांचा कालावधी वाचणार आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे हे शक्य होणार आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते शिर्डी हा प्रवास फक्त एक तास आणि दहा मिनिटात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. तसेच या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हा बारा तासांचा प्रवास मात्र साडेतीन तासात पूर्ण होणार असे देखील सांगितले जात आहे.
विशेष बाब अशी की, या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार झाला आहे. तसेच हा प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थातच डीपीआर गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाला आणि रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार प्रकल्प
हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांना कनेक्ट करणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गास समांतर राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गास जवळपास 68% समांतर राहील.
या मार्गाची सुरुवात बीकेसी मधून होणार आहे. बीकेसी मधून सुरू झाल्यानंतर हा मार्ग मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरून पुढे ठाण्याला जाणार आहे. मग तेथून पुढे हा मार्ग शहापूर, घोटी, इगतपुरी, नाशिक, शिर्डी आणि नंतर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्याकडेने नागपुर पर्यंत जाणार असल्याची प्राथमिक माहिती डीपीआर मधून समोर आली आहे.
या बुलेट ट्रेन मार्गाची लांबी जवळपास 741 किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी जवळपास 1.7 लाख कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावरून ताशी 350 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार असल्याचे सांगितले जात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास सव्वा चार तासात आणि मुंबई ते शिर्डी हा प्रवास मात्र एक तास आणि दहा मिनिटात पूर्ण होणार आहे.
या गाडीने प्रवासासाठी सध्याच्या फर्स्टक्लास एयर कंडीशनर प्रवास भाड्याच्या दीडपट भाडे करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास प्रतिमान होण्यास मदत मिळणार आहे. यामुळे मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवासही सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.