Mumbai Vande Bharat Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राजधानी मुंबईला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
सध्या स्थितीला भारतात 82 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. या 82 हायस्पीड ट्रेन 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि गतिमान झाला आहे.
आपल्या महाराष्ट्रातील 7 रेल्वे मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
यामुळे संबंधित रेल्वेमार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे. या ट्रेनचा वेग आणि या मध्ये असलेल्या आधुनिक सोयी-सुविधा रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी बनवत आहेत.
त्यामुळे या गाडीला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर वर्ष 2024 मध्ये 60 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
अर्थातच देशातील विविध रेल्वे मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातीलही काही रेल्वे मार्ग समाविष्ट राहणार आहेत.
मुंबईला मिळणार नवीन वंदे भारत
अशातच आता दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी मंगळुरू सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत करण्याची विनंती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.
अर्थातच मंगळूर सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मुंबई पर्यंत धावली पाहिजे अशी विनंती खासदार महोदयांनी केली आहे.
जर खासदार महोदयाच्या या विनंतीला मान मिळाला तर मुंबईला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
शिवाय खासदार नलिन कुमार कटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना कासारगोड आणि तिरुअनंतपुरा दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरूपर्यंत वाढवण्याची विनंती केली होती. विशेष बाब म्हणजे खासदार महोदयांची ही विनंती रेल्वे मंत्रालयाने मान्य करून मंजूर केली आहे.