बातमी कामाची ! ‘या’ बँका FD वर देत आहेत बेस्ट ऑफर, 1 वर्षाच्या एफडीवर मिळणार 8.50 टक्क्यांचे व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD News : बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. अलीकडे फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना बँकांकडून चांगला परतावा मिळू लागला आहे. त्यामुळे अनेकजण आता बँकेत एफडी करायला विशेष प्राधान्य दाखवत आहेत.

गुंतवणुकीसाठी इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी आता बँकेत एफडी करणे सर्वाधिक चांगले मानले जात आहे. याचे कारण म्हणजे बँकेतील एफडी मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.

याशिवाय आता चांगले व्याजही ऑफर होत असल्याने अनेकांनी एफडी करण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, ज्या बँका एफडीवर चांगले व्याज देत असतील तेथेच FD करणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की, एफडीवर बेस्ट ऑफर पुरवत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहितीविषयी सविस्तर.

एयू स्मॉल फायनान्स बँक : एयू स्मॉल फायनान्स बँक ही राजस्थान राज्यातील जयपूर येथील एक छोटी फायनान्स बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीचा पर्याय देते. विशेष म्हणजे एफडीवर बँकेकडून चांगले व्याजही दिले जात आहे. जर ग्राहकांनी 18 महिन्यांसाठी या बँकेच्या मुदत ठेव योजनेत पैसे जमा केले तर त्यांना 8 टक्के दराने व्याज मिळते.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक : इक्विटास ही आणखी एक फायनान्स बँक आहे. ही बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना FD वर चांगले व्याज देत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या बँकेत जर एक वर्षासाठी FD केली तर ग्राहकांना त्यावर 8.20 टक्के व्याज मिळू शकते.

तसेच 3 वर्षांच्या ठेवींवर 8 टक्के आणि 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.25 टक्के व्याज दिले जात आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक : ही बँक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगली ऑफर देत आहे. गुंतवणूकदारांसाठी या बँकेकडून काही खास ऑफर सुरु झाल्या आहेत.

या बँकेत ग्राहकांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली तर त्यांना ८.११% व्याज मिळते. तसेच पाच वर्षांच्या कालावधीच्या FD साठी बँकेकडून 8% एवढे व्याज दिले जात आहे. 

जन स्मॉल फायनान्स बँक : बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर जबरदस्त व्याज दिले जात आहे. ही बँक 1 वर्षासाठी FD केल्यास 8.50 टक्के व्याज देते. ३ ते ५ वर्षे कालावधीसाठी पैसे ठेवल्यास ७.२५ टक्के व्याज मिळते. 

Leave a Comment