नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील कोणकोणत्या 19 देवस्थानांना जोडणार ? पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Goa Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या विविध प्रकल्पांमुळे राज्याची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत खूपच मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत.

तसेच काही मार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सध्या राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत समृद्धीचे नागपूर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. पण यापैकी नागपूर ते भरवीर पर्यंतचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे.

तसेच भरवीर ते इगतपुरी हा टप्पा देखील लवकरच सुरू होण्याची आशा आहे. शिवाय इगतपुरी ते आमने पर्यंतचा टप्पा देखील लवकरात लवकर बांधून पूर्ण होणार अशी आशा आहे. एकंदरीत संपूर्ण समृद्धी मार्ग येत्या काही महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो.

दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुंबई ते गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाच्या अलाइनमेंटला नुकतीच राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता मिळाली असल्याने येत्या काही दिवसात या महामार्गाचा डीपीआर देखील फायनल होणार अशी आशा आहे.

विशेष म्हणजे डीपीआर फायनल झाल्यानंतर या वर्षाअखेरपर्यंत या महामार्गाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस आहे. या महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे.

हा मार्ग महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील 19 देवस्थानांना जोडणार  आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा महामार्ग राज्यातील कोणत्याही 19 देवस्थानांना कनेक्ट करणार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा राहणार रूट ?

हा महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा राहणार असून वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार आहे. तसेच हा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्त होणार आहे. म्हणजेच हा महामार्ग गोव्याच्या सीमेपर्यंत जाणार आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे.

सध्या नागपूर ते गोवा असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 21 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. परंतु जेव्हा हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास फक्त आणि फक्त 11 तासात पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा जवळपास दहा तासांचा कालावधी वाचणार आहे.

या महामार्गाला 28 ठिकाणी इंटरचेंज राहणार आहेत. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार ?

वर्धा जिल्हा : केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर, सेवाग्राम

वाशीम : पोहरादेवी

नांदेड : माहूरगड शक्तिपीठ, सचखंड गुरुद्वारा

हिंगोली : ओढ्या नागनाथ

बीड : परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ

धाराशिव : तुळजापूर

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट

सांगली : औदुंबरचे दत्त मंदिर

कोल्हापूर : नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर आणि संत बाळूमामा समाधिस्थळ, आदमापूर

सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी 

Leave a Comment