Nagpur Railway News : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. अतिरिक्त गर्दीमुळे मात्र प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. आतापर्यंत रेल्वेने अनेक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. काही उन्हाळी विशेष गाड्या सुरू देखील झाल्या आहेत.
यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. उन्हाळी सुट्टी निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांना उन्हाळी विशेष गाड्यांचा मोठा फायदा होत आहे. यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहत आहे.
दरम्यान उपराजधानी नागपूर येथून आता थेट उत्तर प्रदेश मधील गोरखपुरसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय झाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
गोरखपूर येथून नागपूरला येणाऱ्या आणि नागपूर येथून गोरखपुरला जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा फायदा होणार आहे. विशेष बाब अशी की, ही गाडी आजपासून सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१२०७ नागपूर-गोरखपूर ही विशेष रेल्वेगाडी आज 21 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. ही गाडी रोज सकाळी साडे सात वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहा वाजता गोरखपूरला पोहचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१२०८ गोरखपूर-नागपूर ही विशेष ट्रेन उद्यापासून अर्थातच २२ एप्रिलपासून दररोज सकाळी ९.१५ वाजता गोरखपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नागपूर स्थानकावर पोहचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर ते गोरखपूर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस गाडी आमला, बैतूल, घोडाडोंगरी, इटारसी, भोपाळ, ललितपूर, लक्ष्मीबाई झांसी, उरई, पोखरायन, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाहनगर, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
यामुळे नागपूर ते गोरखपूर आणि गोरखपुर ते नागपूर असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.