शेतकऱ्यांनो, शेवगा लागवडीचा प्लॅन आहे का ? मग शेवग्याच्या ‘या’ नव्याने विकसित जातीची लागवड करा, मिळणार विक्रमी उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shevga Lagwad Marathi : शेवग्याची महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. शेवग्याच्या शेंगा भाजीपाला म्हणून खाल्या जातात. शेवग्यात असणारे औषधी गुणधर्म पाहता त्याच्या शेंगांना बाजारात नेहमीच मागणी असते. यामुळे शेवग्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

विशेष बाब अशी की बाजारात शेवग्याचा पाला देखील विकला जातो. शेवग्याच्या पाल्यापासून पावडर बनवली जाते आणि याची बाजारात मोठ्या चढ्या दरात विक्री होत आहे. एकंदरीत शेवग्याची शेती ही दुहेरी उत्पादनासाठी केली जात आहे.

यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. तथापि कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्या पिकाच्या सुधारित वाणाची लागवड करणे आवश्यक आहे.

त्यामुळे जर तुम्हालाही शेवग्याची लागवड करायची असेल, जर तुम्हीही नजिकच्या भविष्यात शेवगा लागवडीचा बेत आखत असाल तर तुम्हाला सुद्धा शेवग्याच्या सुधारित जातीची लागवड करावी लागणार आहे अन्यथा तुमचे नुकसानही होऊ शकते.

अशा परिस्थितीत, आज आपण शेवग्याच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण शेवग्याच्या ज्या सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ती जात अलीकडेच विकसित करण्यात आली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया शेवग्याच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीविषयी सविस्तर माहिती.

शेवग्याच्या पीकेएम-1 जातीची लागवड ठरणार फायदेशीर 

पीकेएम-1 ही शेवग्याची नव्याने विकसित झालेली एक सुधारित जात आहे. या जातीची लागवड अनेक शेवगा उत्पादक राज्यांमध्ये केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार शेवग्याचा हा सुधारित प्रकार तामिळनाडू येथील तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पेरियाकुलम् फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे.

शेवग्याच्या या जातीची लागवड केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या काळात या जातीच्या पिकाला फळधारणा होते. या जातीच्या शेंगाची लांबी 45 ते 50 मीटर एवढी असते. आपल्या महाराष्ट्रातील हवामानात देखील या जातीची लागवड केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे राज्यातील हवामान या जातीला विशेष अनुकूल असून आपल्या महाराष्ट्रातील हवामानात या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते असा दावा केला जात आहे. या जातीच्या एका झाडापासून एका वर्षात 30 किलो शेंगाचे उत्पादन मिळू शकते अस बोलल जात आहे.

म्हणजे या जातीच्या एका झाडापासून ऍव्हरेज 650 ते 850 यादरम्यान शेवगा शेंग उत्पादन मिळणार आहे. यामुळे या जातीची लागवड राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

तथापि, शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा मगदूर आणि स्थानिक हवामान या गोष्टींची काळजी घेऊन योग्य जातींची निवड करणे आवश्यक आहे. या कामी शेतकरी बांधव कृषी तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात.

Leave a Comment