Namo Shetkari Yojana : शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आणि फायद्याचा आहे. खरंतर, वर्तमान सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली होती.
राज्य शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात त्याप्रमाणेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या सहा हजार रुपयांचे वितरण होणार आहे. विशेष बाब अशी की पीएम किसान साठी जे शेतकरी पात्र ठरतील तेच नमो शेतकरीसाठी पात्र राहणार आहेत.
म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरीचे 6000 असे एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान या योजनेची घोषणा होऊन आता सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे तरीदेखील नमो शेतकरीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत होती. या योजनेचा पहिला हप्ता केव्हा जमा होईल हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. वास्तविक नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा Pm Kisan च्या चौदाव्या हफ्त्यासोबत दिला जाणार होता. मात्र असे काही झाले नाही.
परंतु नमो शेतकरी साठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली होती. दरम्यान, आज या योजनेबाबत शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने या योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
यामुळे आता या योजनेचा पहिला हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे. परंतु या योजनेचा पहिला हप्ता केव्हा जमा होणार याबाबत अद्याप कोणतीच तारीख समोर आलेली नाही. मात्र या योजनेचा पहिला हप्ता हा विजयादशमीपूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार यात शंकाच नाही.