मोठी बातमी ! समृद्धी महामार्गलगत ‘या’ 22 ठिकाणी तयार होणार औद्योगिक शहरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samrudhhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर ही दोन्ही शहरे थेट रस्ते मार्गाने जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केला जात असून आतापर्यंत या सातशे किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सहाशे किलोमीटर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भरवीर पर्यंतचा टप्पा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भरवीर ते मुंबई पर्यंतचा बाकी राहिलेला भाग देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

समृद्धी महामार्ग अर्थातच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फक्त दोन कॅपिटल शहरांना जोडतो असेच नाही तर या मार्गामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई एकमेकांना जोडले जाणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान या समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

खरंतर या महामार्गचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा मार्ग या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्णपणे बांधून तयार होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. अशातच आता राज्य शासनाने या मार्गाच्या एकूण 22 इंटरचेंज वर औद्योगिक वसाहती स्थापित करण्याचा महत्त्वाचा प्लॅन आखला आहे. विशेष म्हणजे यासाठी वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.

याबाबत नासिक येथे उद्योजकांसोबत महत्त्वाची अशी बैठक पार पडली आहे. या बैठकीत अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या आशा समजून घेतल्यात. दरम्यान औद्योगिक वसाहती स्थापित करण्यासाठी बैठकी सुरू झाल्या असल्याने आगामी काळात या महामार्गालगत औद्योगिक शहरांच्या उभारणीला चालना मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

कोणत्या ठिकाणी विकसित होणार औद्योगिक शहरे

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर एकूण 22 इंटरचेंज आहेत. आता या इंटरचेंजलगत औद्योगिक शहरे तयार होणार आहेत. यासाठी उद्योजकांसोबत बोलणी सुरू झाली आहे. उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर कोणत्या इंटरचेंजवर कोणत्या प्रकारची औद्योगिक वसाहत तयार करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार केला असता सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील तीन इंटरचेंजवर औद्योगिक शहरे विकसित करण्याबाबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे यावेळी संभाव्य औद्योगिक शहरांचे अर्थातच टाऊनशिपचे सादरीकरण देखील झाले आहे. समृद्धी महामार्गाचा सर्व 22 इंटरचेंजलगत शिक्षण, पर्यटन, कृषी प्रक्रिया, औद्योगिक मेडिकल यासारख्या औद्योगिक वसाहतींचा विकास केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ-अमरावती, जालना, शहापूर, एमआयडीसी बुटीबोरी, सिंधी ड्रायपोर्ट, वर्धा, इगतपुरी, आर्वी पुलगाव, धामणगाव रेल्वे, छत्रपती संभाजी नगर, कारंजा लाड, लासूर, सेलू बाजार, मालेगाव जहांगीर, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, शेंद्रा, वेरूळ, वैजापूर, शिर्डी, सिन्नर आणि नाशिक कनेक्टर या इंटरचेंजलगत औद्योगिक शहरे विकसित होणार आहेत.

Leave a Comment