याला म्हणतात जिद्द ! कोरोनात नोकरीला मुकला, एका पायाने अपंग तरुणाने शेतीमध्ये चमत्कार केला, केळीच्या बागेतून लाखोंची कमाई केली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये मोठे बदल केले आहेत. शेतीतील हे बदल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आता शेतकरी बांधव आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बाजारात ज्या पिकांची मागणी आहे त्याच पिकांची लागवड आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका पायाने अपंग तरुणाने देखील अशीच काहीशी कामगिरी केली आहे. कोरोनामध्ये नोकरी गमावल्यानंतर धाराशिवच्या एका प्रयोगशील शेती सुरू करून लाखोंचे उत्पन्न मिळून दाखवले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे एकुरका येथील अमोल राजाभाऊ यादव यांनी ही किमया साधली आहे.

खरंतर, अमोल एका पायाने अपंग आहेत. त्यांनी जेमतेम नववी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. ते ड्रायव्हर म्हणून पुण्यात कामाला होते. एका कंपनीत ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र कोरोना काळात त्यांची नोकरी गेली.

वास्तविक कोरोनामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे अनेकांना नोकरीला मुकावे लागले होते. अमोल यांची देखील कोरोनात नोकरी केली त्यामुळे ते हताश झाले होते. नोकरी गेल्यामुळे अमोल गावात आले. गावात आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी काय करावे हाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला.

दरम्यान त्यांनी गावात येऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या दीड एकर जमिनीत केळीची बाग लावली. केळीची बाग लावल्यानंतर बागेची योग्य पद्धतीने काळजी घेतली. मात्र मध्यंतरी त्यांच्यासमोर पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी त्यांनी टँकरच्या माध्यमातून पाणी टाकले आणि केळी बागेला जोपासले.

अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी केळीबाग जोपासली आणि याचाच परिणाम म्हणून त्यांना केळीच्या बागेतून चांगले उत्पादन मिळाले आहे. विशेष बाब अशी की केळीच्या बागेत त्यांनी आंतरपीक म्हणून कोबीची देखील लागवड केली होती. त्यांनी उत्पादित केलेली केळी दुबई, इराक यांसारख्या देशांमध्ये पाठवण्यात आली. याचा परिणाम म्हणून त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे.

खरंतर अमोल यांचे कुटुंबीय आधी पारंपारिक शेती करायचे. परंतु कोरोनामध्ये नोकरी गेल्यानंतर गावी परतत अमोल यांनी आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून त्यांना आता लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निश्चितच, शेतीमध्ये आधुनिक प्रयोग केलेत तर शेती व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न कमावले जाऊ शकते याचा मुलांनी दाखवून दिले आहे.

Leave a Comment