राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ महिलांना आता मिळणार अतिरिक्त 6 हजाराचा लाभ, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme : देशातील विविध घटकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. यामध्ये महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, असंघटित कामगार, ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्तींसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना चालवल्या आहेत. यामध्ये पीएम मातृत्व वंदना योजनेचा देखील समावेश होतो. दरम्यान या योजनेबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पीएम मातृत्व वंदना योजना -2 लागू करण्याची घोषणा केली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलेला पहिल्या अपत्यसाठी पाच हजार रुपयाची रक्कम दिली जाते. खरंतर भारत हा वेगाने विकसित होत आहे. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे भारताची वेगाने घोडदौड सुरू आहे. परंतु अद्याप देशात कुपोषण आणि भूकबळीची समस्या कायम आहे.

अशा परिस्थितीत देशातील कुपोषण आणि भूकबळीची समस्या कमी करण्यासाठी तसेच बालमृत्युदर कमी करण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना आणि नवजात बालकांना चांगले पोषण आणि आरोग्य लाभावे यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे.

दरम्यान आता या योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. पीएम मातृत्व वंदना योजना दोन लागू केली जाणार आहे. या अंतर्गत आता स्त्री भ्रूण हत्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता पीएम मातृत्व वंदना योजना दोन अंतर्गत दुसरे अपत्य जर मुलगी झाली तर सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

हे सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत. सोमवारी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतची घोषणा केली आहे. तसेच पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिले जाणारे पाच हजार रुपये आता दोन टप्प्यात दिले जाणार आहेत.

कोणाला मिळणार लाभ

ज्या गरोदर महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

तसेच 18 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जर समजा दुसऱ्या अपत्य जुळे झाले आणि दोन्ही मुलीचे झाल्या तर फक्त एका मुलीसाठीच हा लाभ दिला जाईल.

जर समजा दुसरे अपत्य जुळे झाले आणि एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर फक्त मुलीसाठीच हा लाभ दिला जाईल.

Leave a Comment