महाराष्ट्रात ‘ह्या’ ठिकाणी धावणार डबल डेकर मेट्रो ! वाहतूक कोंडी कायमची संपणार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik News : नासिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. शहराची ओळख वाईन सिटी म्हणून होते. शिवाय नासिक एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. नाशिक जिल्ह्यात आशिया खंडाची सर्वाधिक मोठी कांद्याची बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शहरात दिवसेंदिवस औद्योगीकरण वाढत आहे.

वाढते शहरीकरण आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे. भविष्यात ही वाहतूक कोंडीची समस्या आणखी जटिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून नाशिक शहरात वेगवेगळी विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

इनर रिंग रोड तसेच बाह्य रिंग रोड प्रस्तावित

यात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात इनर रिंग रोड तसेच बाह्य रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय शहरात 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग देखील तयार करण्याचे नियोजन आहे. यामध्ये द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्ग करणे प्रस्तावित आहे.

मात्र आता केंद्र शासनाच्या माध्यमातून द्वारकाऐवजी थेट सारडा सर्कल ते दत्त मंदिर ऐवजी थेट नाशिक रोड रेल्वे स्टेशन दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्यावर विचार केला जात आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केला असून हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपणार

सारडा सर्कल ते थेट नाशिक रोड दरम्यान डबल डेकर मेट्रो मार्ग झाल्यास नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कायमची निकाली निघू शकते असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते. म्हणून हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नाला आता यश आले असल्याचे बोलले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. पण नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वधारत आहे. तसेच नाशिकरोड ते पुणे या हायस्पीड लोहमार्गाचे काम लवकर सुरू होवून येत्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या येत्या काही वर्षात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डबल डेकर मेट्रो मार्ग विकसित

परिणामी सध्या प्रस्तावित असलेला द्वारका ते दत्त मंदिर दरम्यान उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्ग हा प्रकल्प येत्या काही वर्षातील वाहतूकीसाठी कुचकामी ठरणार असल्याने द्वारका ते दत्त मंदिर ऐवजी सारडा सर्कल ते थेट नाशिक रोड दरम्यान डबल डेकर मेट्रो मार्ग विकसित करणे किती गरजेचे असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदय यांना पटवून दिले.

यासाठी त्यांनी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडे देखील पाठपुरावा केला आणि केंद्रीय नगर विकास मंत्रालयाला देखील सध्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गात बदल करण्याचे आवश्यक असल्याचे पटवून दिले.

प्रस्ताव आता राज्य शासनाकडे

गोडसे यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आणि केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडे तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे यासाठी पाठपुरावा सुरू केला. यानुसार आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुधारित प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

Leave a Comment