नोकरीं सोडा, 25 हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, लाखोत कमाई होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Business Idea Marathi : अलीकडे व्यवसाय करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. नोकरी ऐवजी तरुणांना आता व्यवसायाच करावासा वाटत आहे. काही हजाराची नोकरी करून लोलक बनण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय करून मालक बनावे असे स्वप्न आता नवयुवक तरुण उराशी बाळगत आहेत.

यामुळे आता मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची शोधाशोध करण्याऐवजी व्यवसायासंदर्भात माहितीची जमवाजमव करतात. अशा स्थितीत जर तुम्हीही नोकरी ऐवजी व्यवसाय करू इच्छित असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.

कारण की आज आपण एका भन्नाट व्यवसायाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. खरंतर, व्यवसाय म्हटलं की मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. यामुळे अनेक तरुण इच्छा असताना देखील पैशाअभावी व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.

पण आज आपण अशा एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत ज्या व्यवसायाची सुरुवात मात्र काही हजारात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू होणारा हा व्यवसाय बंपर परतावा देणारा ठरणार आहे. आज आपण मात्र 25 हजारात सुरू होणाऱ्या एका व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

कोणता आहे तो व्यवसाय

आज आपण 25 हजारात सुरू होणाऱ्या कार वॉशिंगच्या व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत. हा व्यवसाय जरी कमी गुंतवणुकीत सुरू होत असला तरीदेखील यापासून महिन्याकाठी 50,000 पर्यंतची कमाई होऊ शकते. म्हणजेच 25 हजार रुपये गुंतवून दुप्पट कमाई या व्यवसायातून केली जाऊ शकते.

कार वॉशिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता भासणार आहे. हे वॉशिंग मशीन बाजारात बारा हजारापासून ते एक लाख रुपये किमतीचे आहेत. पण जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल तर सुरुवातीलाच महागडे मशीन घेणे टाळावे.

जेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात कस्टमर येऊ लागतील तेव्हा तुम्ही मोठे मशीन घेऊ शकता. पण सुरुवातीला बाजारात उपलब्ध असणारे कमीत कमी किमतीचे मशीन तुम्ही घेतले पाहिजे. मार्केटमध्ये कमर्शियल मशीन 12 हजारापासून सुरू होते. याव्यतिरिक्त तुम्हाला दोन हॉर्स पावरची मोटर घ्यावी लागेल.

ही मोटर जवळपास दोन हजार रुपयांना मिळते. म्हणजेच मोटर आणि मशीन असे तुम्हाला 14 हजार रुपये लागतील. यामध्ये पाईप आणि नोझलचा खर्च देखील समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त नऊ ते दहा हजार रुपये तुम्हाला एक 30 लिटर कॅपॅसिटी असलेला व्याक्युम क्लिनर घ्यावा लागेल.

यासोबतच वॉशिंगचं सामान शॅम्पू, ग्लोव्ह्ज, टायर पॉलिश, डॅशबोर्ड पॉलिशचा पाच लीटरचा कॅन असे काही आवश्यक सामान तुम्हाला खरेदी करावे लागेल. यासाठी देखील तुम्हाला दोन हजार पर्यंतचा खर्च करावा लागणार आहे. एकूणच या व्यवसायासाठी 25,000 पर्यंतचा खर्च येईल. 

व्यवसायासाठी योग्य जागा निवडा

हा व्यवसाय ऑटोमोबाईलशी निगडित आहे. यामुळे व्यवसायाची जागा अशा ठिकाणी निवडा ज्या ठिकाणी ऑटोमोबाईलशी संबंधित कामे होतात. शक्यतो मेकॅनिकची दुकान असेल अशा भागात कार वॉशिंग सेंटर सुरू करा. किंवा तुम्ही मोठ्या सोसायटीमध्ये देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

नाहीतर महामार्गलगतही हा व्यवसाय चालवला जाऊ शकतो. पण हा व्यवसाय शहराच्या शेजारी सुरु करा म्हणजे तुमच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार लवकर होईल. तसेच जर या व्यवसायासाठी तुमच्याकडे स्वतःची जागा असेल तर उत्तम जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर भाडेतत्त्वावर तुम्हाला जागा घ्यावी लागेल.

किती कमाई होणार?

छोट्या कार वॉश करण्यासाठी ग्रामीण भागात दीडशे रुपयांपर्यंत चार्ज घेतले जातात. मात्र छोट्या कार शहरी भागात अडीचशे रुपयांपर्यंत वॉश केल्या जातात. तसेच मोठ्या कार साडेतीनशे ते साडेचारशे रुपयांपर्यंत वॉश करून मिळतात. याचाच अर्थ कमाईच्या आकड्यात कमी जास्त होणार आहेत. मात्र ऍव्हरेज पन्नास हजार रुपये प्रति महिना या व्यवसायातून उत्पन्न मिळू शकते.

Leave a Comment