नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको नवीन वर्षात ‘इतक्या’ हजार घरांची लॉटरी काढणार, केव्हा निघणार लॉटरी ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Mumbai Cidco Lottery : येत्या काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान येणारे नवीन वर्ष नव्याने घर घेणाऱ्या लोकांसाठी खूपच खास राहणार आहे. नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे.

अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. बिल्डिंग मटेरियल, इंधन, मजुरी यांचे दर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने आता घरांच्या किमती देखील वाढत चालल्या आहेत.

यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे नाशिक यांसारख्या महानगरांमध्ये घर घेणे आता आव्हानात्मक बनत चालले आहे. त्यामुळे राज्यातील अनेकजण सिडको आणि म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घराची खरेदी करत असतात.

म्हाडा आणि सिडकोकडून परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातात. म्हाडा आणि सिडको घरांसाठी लॉटरी काढत असते. या लॉटरीच्या माध्यमातून मग या परवडणाऱ्या घरांची विक्री होते.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये येत्या नवीन वर्षात सिडकोच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली जाणार आहे.

सिडको तब्बल साडेतीन हजार घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचे बोलले जात आहे. 26 जानेवारी 2024 अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर निघणार असा दावा केला जातोय.

हाती आलेल्या माहितीनुसार, सिडकोकडून रेल्वे स्थानका लगत असलेल्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची निर्मिती केली जाणार आहे.

येत्या चार वर्षात सिडको या मोकळ्या जागेवर जवळपास 67 हजार घरांची निर्मिती करणार आहे. या घरांची उभारणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

दरम्यान, या उभारल्या जात असलेल्या घरांपैकी साडेतीन हजार घरांची निर्मिती आता अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे या घरासाठी नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच लॉटरी काढली जाणार आहे.

या घरांसाठीची सोडत नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीला काढण्याचे सिडकोचे नियोजन असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Leave a Comment