New Voter ID Card Application : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लवकरच जाहीर होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. अर्थातच खासदार निवडीसाठी पाच वर्षांनी पुन्हा एकदा निवडणुका रंगणार आहेत.
यामुळे आता मेंबर ऑफ पार्लमेंट निवडीसाठी मतदार राजाला पुन्हा मतदानाचा अधिकार उपलब्ध होणार आहे. दरम्यान येत्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन मतदार मत देण्यासाठी तयार आहेत. तथापि काहींनी अजूनही मतदान कार्ड बनवलेले नाही.
भारतात मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी म्हणजे नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
मात्र आता नवीन मतदान कार्डसाठी अर्ज करण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे. कारण की, आता घरबसल्या देखील नवीन मतदान कार्ड साठी अर्ज दाखल करता येत आहे. यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन तयार झाले आहे.
या नवीन ॲप्लिकेशनचा वापर करून आता अवघ्या दोन मिनिटात नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने घरबसल्या मतदान कार्ड साठी अर्ज करता येऊ शकतो.
कसा करणार मतदान कार्डसाठी अर्ज
मतदान कार्डसाठी अर्ज करणे हेतू तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एक ॲप डाऊनलोड करायचे आहे. Voter Helpline App हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवर निशुल्क उपलब्ध होणार आहे.
प्ले स्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्हाला दोन मिनिटात नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वोटर हेल्पलाइन ॲप उघडायचे आहे.
हे अँप उघडले की तेथे तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
हा फॉर्म अर्थातच अर्ज तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. येथे तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड क्रमांक, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील भरावा लागणार आहे.
संपूर्ण तपशील काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. तुमचा अर्ज एकदा सबमिट झाला की या अर्जाची बी एल ओ कडून पडताळणी पूर्ण होईल. यानंतर मग नवीन मतदान कार्ड तुमच्या घरी पोहोच केले जाईल.