बातमी कामाची ! कार इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी चेक करा, नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Insurance Details : तुम्हीही नवीन कार घेणार आहात का, किंवा तुमच्या सध्याच्या कारचा इन्शुरन्स संपणार आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. जर तुम्ही नवीन कार इन्शुरन्स काढण्याच्या तयारीत असाल तर आज आपण कार इन्शुरन्स खरेदी करताना कोणत्या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

खरे तर कार खरेदी करताना कार इन्शुरन्स काढावा लागतो. कार इन्शुरन्स हा खूपच महत्वाचा आहे. कार इन्शुरन्स असला तर एक्सीडेंट आणि चोरी यामुळे होणारे नुकसान भरून निघते. यामुळे कारचा इन्शुरन्स काढला गेला पाहिजे असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे. परिणामी जर तुमचाही कार इन्शुरन्स समाप्त होणार असेल तर तुम्हाला नवीन इन्शुरन्स या ठिकाणी काढावा लागणार आहे.

याशिवाय कार इन्शुरन्स नसेल आणि तुम्ही कार चालवत असाल तर पोलिसांच्या माध्यमातून तुमच्याकडून मोठा दंड सुद्धा वसूल केला जाऊ शकतो. कारण की भारतात विना इन्शुरन्स गाडी चालवणे अवैध आहे. यामुळे जर तुमचा कार इन्शुरन्स संपला असेल तर तुम्ही कार इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे. आता आपण कार इन्शुरन्स घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

इन्शुरन्सचा प्रकार तपासा : आपल्या भारतात कार इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत. तृतीय पक्ष म्हणजेच थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि सर्वसमावेशक विमा. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये, तुमच्यामुळे झालेल्या कोणत्याही अपघाताचा संपूर्ण दावा दुसऱ्या पक्षाला मिळतो. म्हणजेच अशा प्रकारच्या इन्शुरन्स मध्ये जर गाडीचा अपघात झाला तर अशा प्रकरणांमध्ये दुसऱ्या पार्टीला नुकसान भरपाई मिळणार आहे.

दुसरीकडे, सर्वसमावेशक विमा केवळ इतरांना होणारे नुकसान कव्हर करत नाही तर तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान आणि चोरी देखील कव्हर करतो. म्हणून, तुमच्या गरजा पूर्ण करणारा आणि तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल असा विमा निवडा. यामुळे अनेकजण सर्वसमावेशक कार इन्शुरन्स म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह कार इन्शुरन्स काढण्याचा सल्ला देतात. तथापि अशा प्रकारचा विमा हा थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग राहू शकतो.

क्लेम सेटलमेंट रेशो तपासा : कोणत्याही कंपनीकडून कार इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्या विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट प्रमाण तपासा. विमा कंपनीने एका वर्षात कंपनीकडे आलेल्या दाव्यांच्या संख्येच्या तुलनेत एका वर्षात किती दावे मंजूर केले आहेत, हे तपासा.

तसेच, तुम्ही ज्या कंपनीकडून विमा घेत आहात त्या कंपनीकडे दावा कसा दाखल करायचा याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला कार इन्शुरन्स क्लेम करताना कोणतीही अडचण भासणार नाही.

विविध इन्शुरन्स कंपन्यांशी तुलना करा : अनेक प्रकारच्या कार विमा अर्थातच कार इन्शुरन्स योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामुळे सर्व विमा योजना काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आणि त्यांची तुलना केल्यानंतरच कोणता इन्शुरन्स काढायचा याबाबत निर्णय घ्या. कंपनी इन्शुरन्समध्ये काही ॲड-ऑन देत आहे की नाही हे देखील तपासा. असे केल्यास तुम्हाला कोणता इन्शुरन्स प्लॅन फायदेशीर ठरेल हे समजू शकणार आहे.

Leave a Comment