Budget 2024:- काल देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. एवढेच नाही तर सादर करण्यात आलेल्या या बजेटमध्ये काहीही स्वस्त किंवा महाग झालेले नाही.
एवढेच नाही तर सरकारने कस्टम ड्युटी किंवा एक्साईज ड्युटी मध्ये देखील कुठलाही बदल केलेला नाही. शेतकऱ्यांसाठी कुठल्या घोषणा करण्यात आल्या नाहीत किंवा मध्यमवर्ग यांना दिलासा मिळेल अशा देखील कुठल्या घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेल्या नाहीत.
परंतु यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे या बजेटमध्ये सरकारने देशातील जवळपास एक कोटी कुटुंबांना प्रत्येक महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत देण्याची मोठी घोषणा केली आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
महिन्याला मिळेल 300 युनिट मोफत वीज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या भाषणामध्ये या योजनेविषयी माहिती दिली. यामध्ये रूफ टॉप सोलराझेशनच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना आता प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळू शकते.
22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संकल्पच्या पार्श्वभूमीवर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही योजना म्हणजे पंतप्रधान सूर्योदय योजना असून या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.
एवढेच नाही तर या माध्यमातून जी काही वीज तयार होईल त्यातून काही अतिरिक्त उत्पन्न देखील कुटुंबांना मिळणार आहे. घराच्या छतावर बसवण्यात येणाऱ्या या सोलर पॅनलच्या माध्यमातून तुमच्या वापरा व्यतिरिक्त तयार होणारी अतिरिक्त वीज ही वीज वितरण कंपनीला विकता येणार आहे व अशी वीज विकल्यास प्रत्येक वर्षी कुटुंबाला पंधरा ते अठरा हजार रुपये मिळू शकणार आहे.
यामधून तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग करता येणे देखील शक्य आहे. इन्स्टॉलेशनचे काम वाढल्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायिकांना देखील व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे व हे सोलर पॅनल मेंटेनन्स म्हणजेच देखभाल ची गरज पडेल व त्यातून या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना देखील रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.