Onion Rate News : महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस समवेतच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते.
विशेष बाब म्हणजे याची कोकणातही लागवड होते. कोकणात पांढरा कांदा पिकवला जातो. दरम्यान, राज्यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. मात्र डिसेंबर 2023 पासून कांद्याचे बाजार भाव चांगलेच दबावात होते.
याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. आता मात्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे. यामुळे कांदा बाजार भावात सुधारणा होऊ लागली आहे. आज तर राज्यातील काही बाजारात कांद्याला कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तथापि काही बाजारांमध्ये अजूनही कांद्याचे बाजार भाव दबावतच आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान शंभर, कमाल 3100 आणि सरासरी 1600 रुपये भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 3000 आणि सरासरी 1700 रुपये भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 300, कमाल 2811 आणि सरासरी 1555 रुपये असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 200, कमाल 2800 आणि सरासरी 1800 रुपये असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2701 रुपये आणि सरासरी 1750 रुपये असा भाव मिळाला आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लोकल कांद्याला किमान 200, कमाल 2700 आणि सरासरी 1450 रुपये भाव मिळाला आहे.
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 2600 आणि सरासरी 1800 रुपये भाव मिळाला आहे.