नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद ! पण राज्यातील ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला विक्रमी भाव, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate : गेल्या महिन्यात केंद्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार असल्याने आणि महाराष्ट्रासहित काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

खरतर महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकार वारंवार विरोधकांच्या निशाण्यावर येत आहे. शिवाय सर्वसामान्यांमध्ये महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून निवडणुकीत केंद्रातील भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे केंद्र सरकारकडून डॅमेज कंट्रोलचे काम केले जात आहे.

त्यानुसार सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महागाई कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किमती दोनशे रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. विशेष म्हणजे याचा लाभ उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनाच दिला जाणार आहे.

त्याशिवाय किरकोळ बाजारातील कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी सरकार हा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान या निर्णयाच्या विरोधात काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद केले होते. मात्र त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मध्यस्ती करून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू केलेत. पण आता जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव बंद करण्याचे जाहीर केले आहे.

जिल्ह्यातील जवळपास पंधरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 500 व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर कांद्याच्या बाजारभावावर याचा काही परिणाम झाला का? हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला विक्रमी भाव

पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याची 273 क्विंटल आवक झाली. आज या मार्केटमध्ये कांद्याला किमान 3200 रुपये प्रति क्विंटल, कमाल 3400 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 142 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2410 आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 6,997 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 900, कमाल 2300 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला.

Leave a Comment