Onion Rate : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विपक्ष या मुद्द्यावर आमने सामने आले आहेत. सत्ताधारी आणि विपक्ष मधील नेत्यांमध्ये या मुद्द्यावर खडाजंगी होत असतानाच नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत काळासाठी कांद्याचे लिलाव बंद करण्याची घोषणा केली आहे.
यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील मोठे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान होत आहे. निर्यात शुल्क लागू केल्यामुळे सध्या कांद्याची निर्यात मंदावली आहे.
याचा परिणाम म्हणून बाजारभावात घसरन होण्यास सुरुवात झाली आहे. याचा शेतकरी आणि व्यापारी दोघांवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात बेमुदत काळासाठी लिलाव बंद करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही बाजारात कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे.
परंतु अजूनही राज्यातील अनेक बाजारात कांद्याचे भाव वाढलेले नाहीत. दरम्यान, आज राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील एका बाजारात आज कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
यामुळे सध्या कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र राज्यातील काही बाजारात कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 230 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2500, कमाल 5000 आणि किमान 3400 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
याशिवाय आज अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमाल 2700 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 5410 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. आजच्या लिलावात या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 2700 आणि सरासरी 2050 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.