iPhone 14 Price : आपल्याकडे अँपलचा आयफोन असावा असे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही एप्पल चा आयफोन असावा असे वाटते का ? तर मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. खरंतर आयफोनच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत.

आयफोनच्या विक्रमी किमती पाहता अनेकांना इच्छा असतानाही आयफोन खरेदी करता येत नाही. आता मात्र आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. iPhone 14 वर जोरदार डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या अंतर्गत आता ग्राहकांना आयफोन 14 स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Advertisement

या आयफोनवर तब्बल 14 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्ट या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ही ऑफर सुरू आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ऑफरमधून आयफोन 14 स्वस्तात खरेदी करता येणार आहे. पण ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी सुरू राहणार आहे.

iPhone 14 वर बंपर डिस्काउंट

Advertisement

खरेतर, आयफोन 15 बाजारात लॉन्च झाल्यानंतर कंपनीने आयफोन 14 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. 128GB स्टोरेज असलेल्या iPhone 14 च्या बेस मॉडेलची किंमत कपात झाल्यानंतर आता 69,900 रुपये एवढी झाली आहे. विशेष बाब म्हणजे Flipkart वर या आयफोनवर 15 टक्के सूट मिळत आहे. म्हणजे आयफोन 14 फ्लिपकार्ट वर 58,999 च्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे.

याशिवाय जर ग्राहकांनी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर त्यांना 2,950 रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. अशा प्रकारे, iPhone 14 वर सुमारे 14,000 रुपयांची सूट उपलब्ध होणार आहे. अर्थातच जर ग्राहकांना हा आयफोन 14,000 च्या डिस्काउंट वर खरेदी करायचा असेल तर त्यांना ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागणार आहे.

Advertisement

म्हणजे फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या ऑफरनंतर, डिव्हाइसची किंमत फक्त 56,049 रुपये एवढी राहणार आहे. याशिवाय ग्राहकांना जुना फोन एक्सचेंज करता येणार आहे. या एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना कमाल 54,900 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध होणार आहे.

मात्र हे सर्वस्वी जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून राहणार आहे. म्हणजे एक्सचेंज डिस्काउंटचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. iPhone 14 हा लाल, निळा, मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट आणि पिवळा रंग या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *