पॅन कार्ड धारकांसाठी कामाची बातमी ! आता घरबसल्या मागवता येणार Pan Card ची डुप्लिकेट कॉपी, कसा करणार अर्ज ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card News : भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहेत. यातील पॅन कार्ड हे वित्तीय कामकाजांसाठी वापरले जाते. पॅन कार्ड शिवाय कोणतेच वित्तीय कामकाज पूर्ण होत नाही. बँक खाते ओपन करणे, आयकर भरणे, शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे, एफ डी करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या सर्वच वित्तीय कामांसाठी याची आवश्यकता असते.

एवढेच नाही तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक आहे. शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये पॅन कार्डचा वापर बंधनकारक आहे. मात्र एका व्यक्तीला एकदाच पॅन कार्ड काढता येत असते.

अशा परिस्थितीत जर पॅनकार्ड हरवले, चोरीला गेले तर काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, चोरीला गेले असेल किंवा खराब झाले असेल तर तुम्हाला पॅन कार्डची डुप्लिकेट कॉपी मागवता येते.

दरम्यान आज आपण डुप्लिकेट पॅन कार्ड साठी घरबसल्या ऑनलाईन कसा अर्ज करावा लागतो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्ज कसा करावा लागणार?

डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सर्वप्रथम भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटच्या होम पेजवर असणाऱ्या पॅन सर्विस या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर डुप्लिकेट पॅन कार्ड रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागणार आहे.

मग तुमचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता एंटर करायचा आहे. पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायची आहे. मग तुम्हाला तुमची स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे.

तुमचे आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायन अपलोड करावे लागणार आहे. येथे विचारलेली सर्व माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला “सबमिट” बटणावर क्लिक करायचे आहे.

तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर भारतीय आयकर विभाग तुमच्या अर्जाची छाननी करेल आणि १५ दिवसांच्या आत तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड पाठवणार आहे.

Leave a Comment